धनगर समाज

एक प्रगतशील, विकसनशील समाज म्हणुन धनगर समाज आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. तस व्हायचा असेल तर त्यातला प्रत्येक  घटक वैचारिक झाला पाहिजे. सुदृड़ विचारांसाठी सकस शिक्षणाची आवशकयता आहे. शिक्षण हवे तर गाठी धन पाहिजे. धन हवे तर चांगली नौकरी हवी. नौकरी हवी तर चांगले शिक्षण हवे आणि पुन्हा शिक्षण हवे तर गाठी धन. ही साखळी अशीच राहिल….मग अश्या चांगल्या शिक्षणाची माहिती, चांगल्या व्यवसायाच्या अगर नोकरीच्या संधी आपणच आपल्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवीने हे आपले  कर्म आहे. धनगर समाजाला फुले -शाहू-आंबेडकर विचाराच्या प्रवाहात आणण्यासाठी हि कम्युनिटी प्रयत्नशील राहील. धनगर समाजाचे कुलदैवत असलेला बिरोबा म्हणजे प्राचीन बहुजन संस्कृतीतील एक महान सेनापती होय. तसेच मायाक्का देवी हि धनगरांची कुलदेवी. याचा अर्थ धनगर समाज हा मातृसत्ताक परंपरेतील आहे. धनगर समाजाने  आपला सत्य आणि उज्वल इतिहास समजून घ्यावा. या कम्युनिटीच्या माध्यमातून धनगर समाजाबद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

बहुजन समाजातील पुरोगामी आणि सुजान लोकांनी या कार्यात योगदान द्यावे.
जय
अहिल्या, जय मल्हार !!!

धनगर आरक्षण, ‘ध’ चा ‘मा’

दैनिक महाराष्ट्र टाइम्स, नाशिक, दि. २५  ऑगस्ट २०१४
आदिवासींच्या विरोधात धनगर समाज मुळात कधी नव्हताच. कारण धनगर हे आदिवासीच आहे. त्यामुळे हा समाज आदिवासींच्या विरोधात कसा असणार? नेतृत्वहीन असलेल्या धनगर समाजाच्या अज्ञान, निरक्षरपणामुळे या समाजाला आजपावेतो आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले. काही लोक या दोन्ही समाजात तेढ व इर्ष्या निर्माण करण्याचे कारस्थान करत आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 4 जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये (महाजनको) कार्यकारी संचालक –तांत्रिक (1 जागा), कार्यकारी संचालक- सीपी अँड सी (1 जागा), कार्यकारी संचालक – एफ अँड सी (1 जागा), मुख्य महाव्यवस्थापक –सुरक्षा (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 21 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 17 जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उप नियोजक (8 जागा), भूमापक (4 जागा), सर्वेक्षक (3 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 21 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

सिडकोमध्ये 25 जागा

महाराष्ट्र शासनाच्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), वरिष्ठ विकास अधिकारी – सामान्य (1 जागा), सहाय्यक नियोजनकार (1 जागा), उपनियोजनकार (17 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2014 पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 21 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.