समाजामध्ये घडणार्‍या घडामोडींची माहिती,लेख, कार्यक्रमाचे फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करण्‍यासाठी dhangarraja15@gmail.com या ई-मेलवर पाठवा.

कागल तहसीलवर धनगर समाजाचा मोर्चा

लोकमत – मंगळ, ६ मार्च २०१२,कागल

पूर्वजांनी खरेदी केलेल्या जमिनीवर सातबारा व ‘आठ अ’ ला वारसदारांची नावे लावावीत. या मागणीसाठी आज कागलमधील धनगर समाजाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व शिवाजी माळकर, शिवाजी पाचगावे, शामराव शेळके, नंदू माळकर, आकाराम शेळके, विलास रानगे, धुळशिद शेळके, हिंदुराव बोते आदींनी केले. मोर्चात धनगर समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता.सन 1920 ला तत्कालिन अधिपती श्रीमंत सर पिराजीराव घाटगे यांच्याकडे नजराणा रक्कम, लोकल फंड आकारपट्टी भरून सुमारे 200 एकर जमीन येथील धनगर समाजाने घेतली होती. शेळ्या-मेंढय़ा चारण्यासाठी चराऊ पडजमीन सर्वच समाजाने एकत्रितरित्या घेतली होती. गट नं. 220, 272, 322, 328, 369, 391, 411 व 418 अशा गटनंबरच्या जमिनी कागल शहराला लागून आहेत. त्यावेळी समाजातर्फे पंच म्हणून 20 कुटुंबांपैकी पाचजणांची नावे लावली. बाबाजी गोरड, आप्पा खिलारी, बाळू माळकर, लक्ष्मण बोते, धोंडी धनगर असे पाचजण वगैरे अशी कागदोपत्री नोंद झाली. पुढे याच पाच जणांची नावे वारसा पद्धतीने चालत आली आहे. त्यात बाबू गोरडे, बाळू शेयके, आनुबाई गावडे, आनंदा बोते, बळगोंडा माळकर यांचा समावेश आहे. पण उरलेल्या 15 कुटुंबांनी पैसे भरूनही नावे लागलेली नाहीत म्हणून सर्वच वारसदारांची नोंद सातबारा ‘आठ अ’ वर करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 1 = 9